ज्ञानोबा माउली..... तुकाराम....
अखंड जयघोष करीत, पाऊस वाऱ्याची तमा न बाळगता आषाढी एकादशीला पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघालेले हे वारकरी...
देहू पासून संत श्री तुकारामांच्या आणि आळंदी पासून संत श्री ज्ञानेश्वरांच्या पादुका घेऊन पंढरपूर पर्यंतचा अंदाजे २३० किमी चा पायी प्रवास!
लाखो वारकरी आपापल्या दिंड्यांमार्फत या वारी मध्ये समाविष्ट होतात. प्रत्येक दिंडीचे रोजचे वेळापत्रक ठरलेले असते. वाटे मध्ये चालताना अखंड विठूनामाचा गजर आणि त्याला टाळ-मृदूंगाची साथ. . काही वारकरी हातात अखंड भगवा ध्वज मिरवतात, काही स्त्रिया डोक्यावर तुळशी वृंदावन तर काही विठोबाची किंवा तुकाराम, ज्ञानोबांची मूर्ती घेऊन चालत असतात. ठरलेल्या दिनचर्येप्रमाणे दुपारचे भोजन, विश्रांती होते. त्यात देखील भजन, फुगडीचे खेळ, भारूड असे कार्यक्रम होतात. काही गावांमध्ये रिंगणाचे कार्यक्रम होतात.
स्वतःची सुख-दुख:, संसार, कामे, सर्व काही बाजूला सारून, देहभान विसरून निघालेला हा भक्तिसागर. मात्र कुठेही बेशिस्त नाही, वाद नाही. ऊन, पाऊस, रस्त्यातील खड्डे, काटे-कुटे, चढ-उतार, काहीच त्यांना थांबवीत नाही. आपापल्या गरजेपुरतं लागणाऱ्या वस्तूंचं आणि कपड्यांचं एक गाठोडं खांद्यावर घेऊन हा त्यांचा प्रवास सुरु असतो. वारकऱ्यांचा उत्साह, आनंद आणि जिद्द हेच या वारीचे आणि आपल्या संस्कृतीचे सर्वस्व आहे.
काही वर्षांपूर्वी एका मित्राने हे वेड लावलं. फोटोग्राफी च्या उद्देशाने एखादा वीकएंड या वारी मध्ये यायचं, अभंग-ओव्यांचा गोडवा ऐकत, कॅमेरा मध्ये वारकऱ्यांचे आणि या सांस्कृतिक उत्सवाचे फोटो घेऊन, समाधान मिळवून आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यामध्ये परत जायचं. अजूनही ते वेड तसच कायम आहे. दर वर्षी जमेल तेवढे वीकएंड किंवा सुट्टी चे दिवस पकडून, वारी मध्ये समाविष्ट होऊन, आपल्या या महाराष्ट्राच्या थोर संस्कृतीचा, परंपरेचा अनुभव घेण्याचा आणि त्यांचे फोटो काढून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न सुरूच राहील.
पंढरीचा वारकरी। वारी चुको न दे हरी॥
हीच विठ्ठल चरणी प्रार्थना.
Pandharpur Wari
Chanting "Mauli Mauli" and "Gyanba Tukaram", marching on without stopping, performing traditional folk dance and much more...
The Ashadhi Wari is an integral part of Maharashtrian culture. This consists a palkhi carrying Padukas of Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Shree Tukaram Maharaj to Pandharpur.
The pilgrims known as warkaris start the main pilgrimage from Alandi and Dehu to reach Pandharpur via Pune, Saswad, Jejuri, Natepute, Malshiras, Velapur, Shegaon and Wakhri.
On their way, the pilgrims sing bhajans and play "fugdi" with passion and enthusiasm. The pilgrims also play musical instruments like veenas, dholkis, and mridungas. With the saffron coloured triangular flags in hands and tulsi leaves on their heads the pilgrims present a perfect picture of the devotion of Maharshtra. The atmosphere is driven by the strong and intense desires of the Warkaris to reach their destination and offer prayers.
- Dabholkar Ganesh Photography