Shree Ashtavinayak - the eight ancient holy temples of Lord Ganesha located in Maharashtra, out of which two are located in Raigad district, five are in Pune district and one in Ahmednagar District. All the Eight Temples are known to be Swayambhu (self-originated). Ashtavinayak darshan yatra is a pilgrimage to these eight Ganesha temples in a pre-ascertained sequence. (Shree Moreshwar Temple - Morgaon, Shree Siddhivinayak Temple - Siddhatek, Shree Ballaleshwar Temple - Pali, Shree Varadavinayak Temple - Mahad, Shree Chintamani Temple - Theur, Shree Girijatmaj Temple - Lenyadri, Shree Vighnahar Temple - Ozar, Shree Mahaganapati Temple - Ranjangaon).
I visited these temples in 1999 for the first time and since then kept on visiting those temples almost every year, with family or friends and sometimes even with the thrilling experience of biking. Hopefully I’ll continue to do so in future. Temples, Places and facilities were found improved(?) in every visit. Sharing here with you some of those holy places and captured memories...
श्री अष्टविनायक
स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वरः सिद्धिदः
बल्लाळस्तु विनायकस्त्वथ मढे चिंतामणिस्थेवरे ।
लेण्याद्रौ गिरिजात्मजः सुवरदो विघ्नेश्वरश्चौझरे
ग्रामे-रांजणसंस्थितो गणपतिर्कुर्यात् सदा मंगलम् ।।
महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री गणपती. महाराष्ट्रातील त्याच्या आठ पवित्र देवळांचा संच म्हणजे अष्टविनायक. ह्यामधील एक देऊळ अहमदनगर जिल्ह्यात, दोन देवळे रायगड जिल्ह्यात आणि पाच देवळे पुणे जिल्ह्यात वसलेली आहेत. ही आठही देवळे "स्वयंभू" आणि जागृत मानली जातात. साधारण पणे या अष्टविनायकांचे दर्शन शास्त्रोक्त क्रमाने घेतले जाते. (श्री मोरेश्वर - मोरगाव, श्री सिद्धिविनायक - सिद्धटेक, श्री बल्लाळेश्वर - पाली, श्री वरदविनायक - महड, श्री चिंतामणी - थेउर, श्री गिरिजात्मज - लेण्याद्री, श्री विघ्नहर - ओझर, श्री महागणपती - रांजणगाव.)
मी १९९९ मध्ये पहिल्यांदा ह्या देवळांना भेट दिली. त्या नंतर माझ्या सुदैवाने आणि श्रीकृपेने आजपर्यंत प्रत्येक वर्षी, कधी कुटुंबियांसमवेत तर कधी मित्र मंडळींबरोबर तर कधी चक्क बायकिंगचा थरारक अनुभव घेत, माझं ह्या पवित्र यात्रेला जाणं होतंय. भविष्यातही ते असंच चालू राहील अशी श्री चरणी प्रार्थना करतो .
|| गणपती बाप्पा मोरया ||